पनवेल महापालिकेकडून अवघ्या तीन महिन्यात १५० कोटीची वसुली

17 Jul 2023 17:22:00
Panvel Municipal Corporation On Property Tax Bill

पनवेल
: पनवेल महानगरपालिकेकडून अवघ्या तीन महिन्यात १५० कोटींची वसुली करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेकडून मालमत्ता कर देयकांच्या वसुलीवर भर देण्यात आला असून पनवेलकरांकडून यास उत्तम प्रतिसाद देण्यात आला. दरम्यान, एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत म्हणजेच १७ जुलैपर्यंत १५० कोटी रूपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये पडली आहे.
दरम्यान, पनवेल महानगरपालिकेत आजवरच्या इतिहासात इतका करभरणा केव्हाच झाला नसून आजपर्यंतच्या आर्थिक वर्षामध्ये तीन महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या रकमेची करवसुली होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच, पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे महापालिकेने मालमत्ता करधारकांकडून थेट वसुलीची कारवाई सातत्याने सुरु असून मालमत्ताधारकांवरती कारवाईसाठी पालिकेने चार प्रभागांसाठी आठ पथक तयार केली आहेत.

दरम्यान, या पथकात खारघरसाठी २ पथक ,कामोठेसाठी २पथक, नावडेसाठी २पथक, कळंबोलीमध्ये २पथक, पनवेल व नवीन पनवेलसाठी प्रत्येकी १ पथक तयार करण्यात आली आहेत. या प्रत्येक पथकामध्ये १ महापालिका कर्मचारी, २ निवृत्त अधिकारी, १ सिक्युरीटी गार्ड, १ कॅमेरामॅन असे सहा सदस्य आहेत.

Powered By Sangraha 9.0