ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

    17-Jul-2023
Total Views |
MANGLA NARLIKAR
 
पुणे : जेष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. गेले काही महिने त्यांना कॅन्सरचा त्रास सुरू झाला होता. डॉ. मंगला नारळीकर या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पत्नी आहेत. याशिवाय त्या लेखिकाही आहेत.
 
सोप्या भाषेत गणित समजावून सांगणाऱ्या लेखिका म्हणून त्यांची ओळख होती. डॉ. मंगला नारळीकर यांनी महाराष्ट्र सरकारच्या पाठ्यपुस्तक निर्मीती समितीच्या सदस्य होत्या. काही वर्षांपूर्वी मंगला नारळीकरांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. स्तनाच्या कर्करोगावर उपचार घेऊन त्या बऱ्याही झाल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला. त्यामुळेच त्या मागच्या काही दिवसांपासून आजारी होत्या.
 
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी आणि सहकारी म्हणून मंगलाताईंची खंबीर साथ लाभली. त्यांना गीता, गिरिजा व लीलावती अशा तीन मुली आहेत. १९६६ मध्ये त्यांचा डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी विवाह झाला होता. सकाळी अकरा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.