पुणे : पुण्यातील एका दाम्पत्याने घराच्या बाहेर गणपतीची मूर्ती बसवली म्हणून वानवडी येथील फ्लॉवर व्हॅली सहकारी गृहहरचना सोसायटीने तब्बल ५ लाख ६२ हजार ठोठावला आहे. यासोबतच कमिटीने गणपतीची मूर्ती काढण्यासाठी नोटीसही दिली आहे. मात्र नोटीस देऊनही ज्येष्ठ दाम्पत्याने मूर्ती काढण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात दाम्पत्याने न्यायालयात याचिका दाखल केली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
पुण्यातील वानवडी येथे फ्लॉवर व्हॅली सहकारी गृहहरचना सोसायटी आहे. याचं सोसायटीमध्ये संध्या होनावर (६५) व त्यांचे पती सतिश होनावर (७२) हे दाम्पत्य राहते. आपल्या घरात वास्तव्यासाठी आल्यावर त्यांनी घराच्या बाहेर गणपतीची मूर्ती बसवली. आज या मूर्तीला स्थापण करुन जवळपास २० वर्षांचा काळ लोटला आहे.
यासर्व प्रकरणावर बोलतांना फ्लॉवर व्हॅली सोसायटीचे सेक्रेटरी म्हणाले की, आम्ही गणेश मूर्तीच्या विरोधात नाहीत, आमच्या कमिटीने २०१९ साली अतिक्रमणाच्या विरोधात ठराव मंजूर केला होता. तेव्हा आम्ही या सर्वांच्या विरोधात ॲक्शन घेतली. ज्या घराबाहेर अनधिकृत बांधकाम केलेलं होतं, ते काढायला लावलं. पण होनावर कुटुंबियांनी आपला विरोध कायम ठेवला. त्यामुळेच आम्ही नाविलाजाने दंड ठोठावला.
यावर होनहार दाम्पत्यांनी ही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही जेव्हा घरात राहिला आलो तेव्हापासून घराबाहेर गणपतीची मूर्ती बसवलेली आहे. ही मूर्ती घराच्या बाहेर कोपऱ्यात आहे. आम्ही तिची दररोज पूजाही करत असतो. तसेच आजूबाजूला राहणारे लोक देखील येता जाता मूर्तीच्या पाया पडतात. पण आता सोसायटीने मूर्ती बसवली म्हणून दंड ठोठावला आहे.