क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येत वाढ; रिझर्व्ह बँकेकडून आकडेवारी जाहीर

16 Jul 2023 18:14:16
Reserve Bank Report Said Credit Cards Holders Rise

मुंबई
: देशात डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, क्रेडिट कार्डची संख्या ५० लाखांनी वाढली असून यामुळे भारतातील डिजिटल इकॉनॉमीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. तसेच, भारतात २०२३ पर्यंत १० कोटी क्रेडिट कार्ड अपेक्षित होते. परंतु आता आरबीआयने नवीन आकडेवारी प्रसिध्द केली आहे. या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये भारतात ८.६ कोटी क्रेडिट कार्डस् होती, त्यामुळे एप्रिल २०२२ नंतर या आकडेवारीत तब्बल १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, एप्रिल २०२२ मध्ये सुमारे ७.५ कोटी क्रेडिट कार्डधारक होते.

दरम्यान, क्रेडिट कार्डचा वापर वाढण्यास कारणीभूत घटकदेखील असतात. भारतीय रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक, नो-कॉस्ट इक्वेटेड मासिक हप्ते (EMIs) आणि प्रीमियम जीवनशैली बक्षिसे यांच्याद्वारे प्रोत्साहन देऊन मोठ्या तिकीट खरेदीसाठी बँका त्यांचे क्रेडिट कार्ड फ्लिप करत आहेत. हे बँकांच्या सरासरी व्यवहाराच्या स्थिर वाढीमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान, आरबीआयच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये, उद्योगाची सरासरी प्रति व्यवहार ५,१२० रुपये इतकी होती. तसेच, उद्योग प्रति कार्ड सरासरी मासिक खर्च रुपये १५,३८८ रुपये होता. तर एप्रिल २०२२ मध्ये, उद्योग प्रति कार्ड सरासरी खर्च १४,०७० रुपये होता आणि सरासरी व्यवहार ४,७३१ रुपये होता. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डवरील थकित कर्ज एप्रिल २०२२ च्या तुलनेत १.५४ लाख कोटी रुपयांवरून २ लाख कोटी रुपयांपर्यंत ३० टक्क्यांनी वाढले आहे.




Powered By Sangraha 9.0