‘पीएम मित्रा’ पार्कच्या माध्यमातून राज्यात रोजगारनिर्मिती करणार : उद्योग मंत्री उदय सामंत

16 Jul 2023 19:46:45

MahaMTB


मुंबई
: ‘पीएम मित्रा’ पार्क च्या माध्यमातून एक लाख रोजगार मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. तसेच, उद्योग विभागाच्या वतीने राज्यातील उद्योजकांसाठी जे जे लागेल ते देण्यासाठी सहकार्य करेल, असेही उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यात फडणवीस शिंदे पवार सरकार आल्यापासून दहा महिन्यात १ लाख १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले, राज्याला उद्योग क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी उद्योग विभाग कटिबध्द असून ‘पीएम मित्रा’ पार्कमुळे १२ महिन्यात ६ हजार कोटींची गुंतवणूक राज्यात येणार असून १५ हजार कोटी उद्योजकांच्या खात्यावर जमा होणार आहेत, असेही उद्य सामंत यांनी सांगितले. तसेच, राज्यातील उद्योजकांना याठिकाणी जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधा दिल्या जातील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, प्रकल्पासाठी लागणारी जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्यात एका महिन्याच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात १८३ कोटी जमा करण्यात आले. तसेच, राज्यात चांगले कौशल्य विकास केंद्र तयार करण्यात येणार असून यामाध्यमातून चांगले प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यात येणार असल्याचेही उद्योगमंत्री सामंतांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0