मुंबई : मुंबई महापालिकेच्या १९६ माध्यमिक शाळांमध्ये २९४ कौशल्य विकास केंद्रांची उभारणी केल्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रमुख शिक्षण घेता येणार आहे. आगामी काळात राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती मधील प्रायोगिक तत्त्वावर ५०० गावात कौशल्य विकास केंद्र लवकर सुरू करणार असल्याची घोषणा कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या १९६ माध्यमिक शाळांमध्ये मिळून २९४ कौशल्य विकास केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्याचा पथदर्शी प्रकल्प ग्रँट रोड येथील जगन्नाथ शंकरशेट नाना चौक माध्यमिक शाळेत उभारण्यात आला असून, याचे लोकार्पण राज्याचे राज्याचे कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा , राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम कौशल्य विकास केंद्र २०१४ मध्ये सुरू केले. देशातील सर्व युवा पिढीने कौशल्य युक्त शिक्षण घेतले की नोकरीसाठी त्यांना कोणापुढेही हात पसरावे लागणार नाहीत. त्यासाठी युवकांनी कौशल्य युक्त शिक्षण घेणे गरजेचे आहे. शासन फक्त कौशल्य देणार नसून त्यांना उद्योग उभा करण्यासाठी अर्थसाह्य देखील करणार असल्याचेही मंत्री लोढा यावेळी म्हणाले. तसेच, कौशल्य वाढवण्यावर भर देणार असून राज्यातील ग्रामपंचायत मध्ये देखील शेतीवर आधारित कौशल्य शिकवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, . त्याचबरोबर राज्यातील नाका कामगारांनाही शासन प्रशिक्षण देणार असून त्यांचे कौशल्य वाढवण्यावर भर देणार आहेत.राज्यातील एक लाख नाका कामगारांना त्यामुळे कौशल्युक्त प्रशिक्षण घेता येईल. त्याचबरोबर राज्यातील ग्रामपंचायत मध्ये देखील शेतीवर आधारित कौशल्य शिकवण्यात येतील. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती पैकी 500 गावात स्किल सेंटर सुरू करण्यात येतील. महाराष्ट्रातील चारशेहून अधिक आयटीआय व १२७ पॉलिटेक्निकल मध्येही स्किल सेंटर सुरू केले आहेत असेही मंगल प्रभात लोढा यावेळी म्हणाले.