पेरूच्या ३ हजार वर्ष जुन्या प्राचीन मंदिराखाली रहस्यमय बोगदा!

15 Jul 2023 12:48:37
Archaeologists in Peru find 3,000-year-old tunnel in mountain temple complex

नवी दिल्ली : दक्षिण अमेरिकन देश पेरू येथील पुरातत्वशास्त्रज्ञांना एका प्राचीन मंदिरात सुमारे ३ हजार वर्ष जुना बोगडा सापडला आहे. असा अंदाज आहे की, हा बोगदा प्राचीन चवीन संस्कृतीशी संबंधित मंदिरातील इतर खोल्यांकडे घेऊन जातो. या बोगद्यात १७ किलो वजनाचा सिरॅमिकचा तुकडा सापडला आहे. कोंडोर पक्ष्यांचे डोके आणि पंख या तुकड्यावर बनवले आहे. म्हणूनच याला 'कॉन्डॉर पॅसेजवे' म्हटले जात आहे.
 
मंदिराच्या दक्षिणेकडील भागात चवीन संस्कृतीशी संबंधित एक बोगदा सापडला आहे. हा बोगदा अतिशय कमकुवत असल्याचे पुरातत्वशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच तो बंद करण्यात आलायं. हा बोगदा चवीन संस्कृतीच्या सुरुवातीच्या दिवसांची साक्ष देतो. हा बोगदा पेरूमधील हुआरी प्रांतातील चवीन जिल्ह्यात असलेल्या चॅव्हिन डे हुआंटार भागात आढळतो. हे क्षेत्र प्राचीन चवीन संस्कृतीचे सर्वाच महत्वाचे केंद्र आहे. १९८५ मध्ये युनेस्कोने पुरातत्व स्थळांच्या यादीत चाव्हिन डी हुआंटरचा समावेश केला होता हेच कारण आहे.

पुरातत्वशास्त्रज्ञ मानतात की हा परिसर 1500 ते 500 इसवी सन पुर्व दरम्यान बांधला गेला होता. चवीन संस्कृती तिच्या प्रगत कलेसाठी ओळखली जाते. या संस्कृतीशी संबंधित अवशेषांमध्ये सहसा पक्षी आणि मांजरींच्या प्रतिमा असतात.चवीन संस्कृती ही अशी संस्कृती होती, जिथे लोक एकाच ठिकाणी राहून शेती करत. पेरूमध्ये इंका साम्राज्य सत्तेवर येण्यापूर्वी २००० वर्षांहून अधिक काळ चवीन लोक येथे राहत होते.
 
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे पुरातत्वशास्त्रज्ञ जॉन रिक यांनी रॉयटर्सशी केलेल्या संभाषणात सांगितले की, बोगद्याचा दरवाजा मे 2022 मध्ये उघडण्यात आला होता. त्यावेळी येथे सुमारे १७ किलो वजनाचा सिरॅमिकचा मोठा तुकडा सापडला. या सिरॅमिकच्या तुकड्यावर कंडोर पक्ष्याचे डोके आणि पंख कोरलेले आहेत. या बोगद्यात सिरॅमिलच्या वाटीसह हे सर्व सापडले.असे मानले जाते की, कंडोर हा जगातील सर्वात मोठ्या पक्ष्यांपैकी एक आहे. प्राचीन अँडियन संस्कृतींशी संबंधित लोक या पक्ष्याला शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानतात. इतकेच नाही तर कंडोर सूर्य देवाशी संबंधित होता आणि त्याला जगाचा राजा देखील मानले जात असे.
 
पुरातत्वशास्त्रज्ञ जॉन रिक आणि त्यांच्या टीमने या बोगद्याचा शोध लावला आहे. रिक यांनी असेही म्हटले आहे की,या मंदिराच्या संकुलातील बहुतांश भागांचे उत्खनन होणे बाकी आहे. बोगदा सापडल्यानंतर तो अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले. अशा स्थितीत रोबोटिक कॅमेऱ्यांचा वापर करून त्याची तपासणी करण्यात आली.



Powered By Sangraha 9.0