‘वीर मुरारबाजी’ येतोय लवकरच....

    14-Jul-2023
Total Views | 108

veer murarbaji




मुंबई :
मराठी चित्रपटांमध्ये गेला काही काळ हा ऐतिहासिकपटांचा आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. प्रेक्षक या चित्रपटांना चांगला प्रतिसाद देखील देत आहेत आणि त्याची प्रचिती ही बॉक्स ऑफिसवरुन दिसूनच येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य इतके प्रगल्भ आहे की त्यावर कितीही चित्रपट आले तर ते कमीच वाटतील. ‘फत्तेशिकस्त’, आणि ‘पावनखिंड’ या ऐतिहासिकपटांची निर्मीत करणाऱ्या ए.ए या निर्मिती संस्थेने ‘वीर मुरारबाजी’ या चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.


 

'वीर मुरारबाजी' या चित्रपटात मुरारबाजी देशपांडे यांची शौर्यगाथा उलगडणार असून मुरारबाजींची व्यक्तिरेखा अभिनेता अंकित मोहन साकारणार आहे. ऐतिहासिक पावनखिंड रणसंग्राम दिनाचे औचित्य साधून काल शूरवीर बाजीप्रभू देशपांडे तसेच बांदल सेनेच्या अतुलनीय पराक्रम आणि बलिदानाला वंदन करुन ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाचे नवे पोस्टर सादर करण्यात आले होते. लवकरच ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात येईल असे चित्रपटाच्या टीमने जाहीर केले आहे.
 
‘वीर मुरारबाजी’ चित्रपटात अभिनेता अंकित मोहनसह हरीश दुधाडे, तनिषा मुखर्जी, सौरभराज जैन, संतोष जुवेकर, प्राजक्ता गायकवाड यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. दरम्यान, ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांनी सातशे मावळ्यांसह पुरंदर किल्ल्यासाठी दिलेला लढा पाहायला मिळणार आहे. मुरारबाजी देशपांडे यांनी औरंगजेबाने पाठवलेल्या दिलेरखानाच्या सैन्याशी १६६५ मध्ये युद्ध केले होते. मुरारबाजींना या लढाईत वीरमरण आले, यानंतर मिर्झा राजे जयसिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी ‘पुरंदरचा तह’ केला होता.
अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121