
मुंबई : ‘लगान’, ‘स्वदेश’, ‘पानीपत’, ‘जोधा अकबर’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक आशितोष गोवारीकर आता ओटीटी माध्यमावर पदार्पण करणार आहेत. सध्या ओटीटी वाहिनीवर अनेक जुने-जाणते कलाकार पदार्पण करत आहेत. आता यात आणखी एका दिग्दर्शकाची भर झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आशुतोष गोवारीकर मात्र यावेळी दिग्दर्शक किंवा निर्माते म्हणून नाही तर भिनेते म्हणून ओटीटी वाहिनीवप झळकणार आहेत.
नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘काला पानी’ या वेब मालिकेमधून आशुतोष गोवारीकरांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. ‘काला पानी’च्या दिग्दर्शनाची धुरा समीर सक्सेना आणि अमित गोलानी यांनी सांभाळली असून बिस्वपती सरकार, निमिषा मिश्रा, संदीप साकेत आणि अमित गोलानी यांनी ही मालिका लिहिली आहे.
या वेब मालिकेचे कथानक एका अशा समाजावर आधारित आहे, जो समाज नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी प्रयत्न करत असतो. मानव आणि नैसर्गिक संकट यांच्यामधली अदृश्य लढाई यामाध्यमातून पाहायला मिळणार आहे. ‘काला पानी’ या सीरिजमध्ये आशुतोष गोवारीकर यांच्याव्यतिरिक्त मोना सिंह, अमेय वाघ, सुकांत गोयल, अरुशी शर्मा, राधिका मेहरोत्रा आणि विकास कुमार आहे.