चांद्रयानाचं यशस्वी उड्डाण : नंबी नारायणन म्हणतात, "भविष्यात..."

14 Jul 2023 16:52:57
nabI narayanae
 
मुंबई : चांद्रयान-३ भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. इस्त्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीवर देशभरातून इस्त्रोवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. चांद्रयान-३ मोहिमेनंतर इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी सुध्दा इस्त्रोचे अभिनंदन केले आहे.
 
 
नंबी नारायणन यांच्यावर इस्त्रोमध्ये असतांना हेरगिरीचे आरोप लागले होते. या प्रकरणात त्यांना अटकही करण्यात आली होती. चौकशी नंतर त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मागे घेण्यात आले होते. सोबतच त्यांना फसवण्यासाठी हा कट विदेशातील लोकांनी रचल्याचेही उघड झाले होते.
 
नंबी नारायन यांच्यावर आर.माधवन यांनी चित्रपट पण काढलेला आहे. या चित्रपटातील स्टोरीनुसार भारताच्या अंतरळातील प्रगतीला रोखण्यासाठी विदेशी ताकदींनी हेरगिरीचा कट रचला होता. नंबी नारायणन यांना या कटात अडकवण्यासाठी काही भारतीय अधिकाऱ्यांनी या विदेशी ताकदींना मदत केली होती, असंही सांगितल जातं.
 
 
Powered By Sangraha 9.0