मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची भेट घेण्यासाठी ते सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावर दि. १४ जुलै रोजी सकाळी ब्रीच कॅंडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रतिभा पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर गेल्याची चर्चा आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर आता अजित पवारांनी सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सत्ता संघर्ष आणि कौटुंबिक कलहानंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवारांच्या घरी दाखल झाले आहेत. एकंदरीत, अजित पवारांच्या अचानक सिल्व्हर ओक भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.