नवी दिल्ली : गुजरातमधील तीन आणि पश्चिम बंगालमधील सहा जागांवर होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी निवेदन जारी करून गुजरात आणि प. बंगालमधील राज्यसभा उमेदवारांची घोषणा केली आहे.
दरम्यान, गुजरातमधील दोन जागांसाठी भाजपने बाबूभाई देसाई आणि केशरीदेव सिंह झाला यांना उमेदवारी दिली आहे. राजवंशी समाजाचे नेते आणि ग्रेटर कूचबिहार चळवळीचे प्रमुख अनंत महाराज यांना बंगालमधून राज्यसभेसाठी उमेदवार घोषित करण्यात आले. दरम्यान, यापूर्वी केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.