दिल्लीत जीएसटी कौन्सिलची बैठक संपन्न; सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा

12 Jul 2023 14:40:30
GST
 
नवी दिल्ली : जीएसटी कौन्सिलची 50 वी बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर काही वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा किंवा त्यांना जीएसटीमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला, तर दुसरीकडे काही सेवा आणि वस्तूंवर जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
जीएसटी कौन्सिलच्या या निर्णयानंतर येत्या काही दिवसांत वस्तू आणि सेवांच्या किमतीत बदल होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो, हॉर्स रेसिंग महाग होतील. यावेळी मल्टी युटिलिटी आणि क्रॉसओव्हर युटिलिटी श्रेणीतील वाहनांवर 22 टक्के उपकर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर अनेक वाहन महागणार आहेत.
 
जीएसटी कौन्सिलच्या निर्णयानंतर सिनेमागृहातील खाण्यापिण्याचे पदार्थ स्वस्त होणार आहेत. सोबतच आयात केलेल्या कर्करोगाच्या औषधांवर जीएसटी न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रग्णांना दिलासा मिळणार आहे. यानंतर तळलेल्या पॉकीट बंद पदार्थंवर जीएसटी १८% वरुन ५% करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0