‘ज्विगाटो’ चित्रपटाचा समावेश ऑस्कर संग्रहालयात!

11 Jul 2023 16:09:18

zwigato 
 

मुंबई :
कॉमेडियन कपिल शर्मा अभिनित 'ज्विगाटो' हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दिग्दर्शिका नंदिता दास यांनी वेगळ्याच परंतु लोकांच्या मनाला भिडेल अशा विषयाला हात घातला होता. डिलॅव्हरी बॉय ची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाच्या कथेची निवड ऑस्करच्या संग्रहामध्ये करण्यात येणार आहे. चित्रपटाचा अभ्यास करणाऱ्या तसेच चित्रपटांबद्दल अधिक माहिती गोळा करणाऱ्यांना ज्विगाटो या चित्रपटाची कथा अभ्यासता येणार आहे.
 
भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी एक महत्वाचा भाग असणाऱ्या काही कंपन्या व त्यासाठी काम करणाऱ्या डिलव्हरी बॉय यांची कथा सांगणारा ज्विगाटो चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजला गेला. या चित्रपटाचा टीझर टोरंटो आणि बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवला गेला होता.
 
काय आहे ज्विगाटोची कथा?
 
चित्रपटाची कथा एका फ्लोअर मॅनेजरची असून करोना महामारीत त्याची नोकरी जाते. त्यानंतर तो फूड डिलिव्हरीचे काम करायला लागतो. तो फक्त रेटिंग आणि इनसेंटिव्हजच्या मागे फिरत असतो. घर खर्च चालवायला त्याची पत्नीही मदत करतोय. मध्यमवर्गाचं आयुष्य आणि डिलिव्हरी बाॅयचं दु:ख सिनेमात दाखवलंय.
Powered By Sangraha 9.0