नवी दिल्ली : चंदीगडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका ढाब्याचा आहे जिथे एक व्यक्ती रोटी बनवताना रोट्यावर थुंकताना दिसत आहे. मोहम्मद आदिल असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणावर ढाब्याच्या मालकाने सांगितले की, या प्रकरणामुळे लोक संतापले आणि त्यांच्या ढाब्यावर आले. सध्या हा ढाबा बंद करण्यात आला आहे. ८ जुलैपासून हा व्हिडीओ व्हायरल होत असून हा ६ महिने जुना व्हिडीओ असल्याचे मालकाने सांगितले.
हा व्हिडिओ पश्चिम चंदीगडच्या पिंड ३८ भागातील आहे @ajaychauhan41 या ट्विटर हँडलवरून दि. ९ जुलै रोजी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. कारमध्ये बसून बनवलेल्या या व्हिडिओच्या बोर्डमध्ये दुकानाचे नाव 'दिल्ली दरबार ढाबा' दिसत आहे. व्हिडिओ बनवणारी व्यक्ती पंजाबी भाषेत लोकांना रोटी बनवणाऱ्या व्यक्तीचे हे कृत्य पाहण्यास सांगत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीने लाल धार्मिक टोपी घातली आहे. रोट्यांना हाताने आकार दिल्यानंतर तो त्या रोट्यावर थुंकताना दिसत आहे.
दरम्यान व्हिडिओ बनवणाऱ्याने फूड वर्करवर रोट्यांवर थुंकल्याचा आरोप केला आहे. ते शेअर करणाऱ्या हँडलवर 'थुंक जिहाद' अशी हेडलाइनही देण्यात आली आहे. या कारागिरावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ढाबा मालक अकील, कारागीर आदिल
'दिल्ली दरबार' नावाच्या या ढाब्याच्या मालकाचे नाव मोहम्मद अकील आहे. अकीलने स्वतःला दिल्लीचा रहिवासी असल्याचे सांगितले. अकीलच्या म्हणण्यानुसार, कोणीतरी हा व्हिडिओ ६ महिन्यांपूर्वी बनवला होता. जो २ दिवसांपुर्वी व्हायरल झाला होता. मात्र, ढाबा मालक या सूत्रधाराचे नाव सांगू शकला नाही. रोट्यांवर थुंकल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचे नाव अकीलने मोहम्मद अदिल असे सांगितले असून तो मुळचा उत्तर प्रदेश मेरठचा रहिवाशी आहे. मात्र आदिलने ४ महिन्यांपूर्वीच नोकरी सोडल्याचा ढाबा मालकाने केले आहे.
अन्नावर थुंकण्याच्या प्रश्नावर ढाब्याच्या मालकाने सांगितले की, ते थुंकणे नसून फुंकणे आहे. अकील सांगतात की, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त लोकांचा जमाव त्याच्या ढाब्यावर आला आणि त्यांनी ढाबा बंद केला. अकीलने पुढे सांगितले की, पोलीस त्याला आदिलला आणण्यास सांगत आहेत. ते म्हणाले की त्यांच्या दुकानात सर्व प्रकारचे मांसाहारी पदार्थ उपलब्ध होते, परंतु आता या घटनेनंतर त्यांचा बंद असलेला ढाबा पुन्हा कधी उघडेल याबद्दल त्यांना कोणतीही माहिती नाही.
हा व्हिडीओ ६ महिने जुना असल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले. मलोया पोलिस स्टेशनचे एसएचओ जसपाल सिंह म्हणाले की, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिस्थिती शांत करण्यासाठी ते ढाब्यावर गेले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सध्या ढाबा बंद ठेवण्यात आला आहे.