दुकानदार तौसिफ हुसेनने कामगाराला जिवंत जाळले!

10 Jul 2023 11:13:48
Tausif Hussain burnt the worker alive

बेंगलुरु : कर्नाटकातील मंगळुरूमध्ये एका दुकानदाराने किरकोळ कारणावरून एका कर्मचाऱ्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दुकान मालक तौसीफ हुसेन याने स्वतःचाच कर्मचारी गजयान उर्फ ​​जग्गू याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले. गजयान हा गेल्या ४ वर्षांपासून त्याच्या दुकानात काम करत होता. ही घटना दि. ८ जुलै रोजी मूलिहितलू परिसरात घडली. नंतर दुकानदार तौसीफ हुसेन यांने हा अपघात विद्युत शॉकमुळे झाला असे सांगण्यास सुरुवात केली, जेणेकरून कोणाला त्याच्यावर संशय येऊ नये.

तौसीफ हुसैन याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. सुरुवातीला तो विजेचा धक्का लागल्याने ही घटना घडल्याचे पोलीसांना सांगत होता. पण, कडक चौकशीनंतर त्याने सर्व काही पोलीसांना सांगितले. शहर पोलीस आयुक्त कुलदीप कुमार आर जैन यांनी सांगितले की, आजूबाजूच्या लोकांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे. गजयानसोबत तौसीफ हुसैनचे किरकोळ भांडण झाले होते, त्यानंतर त्याने ही घटना घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.

पेट्रोल टाकल्यानंतर गजयानला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सकाळी साडेसात वाजता कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर गेले असता दुकान मालक तौसीफ हुसैन यांच्याशी कोणत्या तरी कारणावरून गजयानचे भांडण झाले. त्यानंतर तौसीफ हुसैन ही हत्या केली. हत्येनंतर तौसिफ हुसेनने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सर्व युक्त्या वापरल्या, मात्र तो अयशस्वी ठरला.

पीडितेला वेनलॉक हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी कलम-३०२ (हत्या) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मोहम्मद तौसीफ असे किराणा दुकान मालकाचे नाव आहे.. मंगळुरू दक्षिण पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

दरम्यान कर्नाटकातील बेळगाव येथे एका जैन साधूची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची घटना घडल्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. जैन मुनी हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.




Powered By Sangraha 9.0