मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! १५ टक्के पाणी कपीतीची शक्यता

01 Jul 2023 19:27:27
mumbai water issue water crisis hangs over

मुंबई
: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिलक्क नसल्यायन ऐन पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. १ जुलै पासून पालिकेकडून मुंबईमध्ये १० टक्के पाणी कपात करण्यात आली असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा न वाढल्यास पुढील आठवड्यापासून १५ टक्के पाणी कपात करण्यात येण्याची शक्यता पालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमधील एकूण उपयुक्त जलसाठा हा १ लाख ८५ हजार ९७२ असून हाच साठा २०२२मध्ये १ लाख ५७हजार ७७३ इतका होता. तर २०२१मध्ये हाच साठा २ लाख ६४ हजार ६१६ दशलक्ष लिटर होता. २०२२ च्या अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात जरी वाढ झाली असली तरी मुंबईतील पाणी कपात कायम असून पाणीसाठ्यात वाढ होणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील आठवड्यापासून १५ टक्के पाणी कपातीस मुंबईकरांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

 
Powered By Sangraha 9.0