शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेकडून आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

01 Jul 2023 07:09:55
Shivsena workers Union Programme

मुंबई
: शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने ४० वर्षांची परंपरा कायम राखत यंदाच्या वर्षी देखील मयुर चंद्रकांत कांबळे यांच्या सक्रिय पुढाकाराने आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिर, प्रति पंढरपुर येथे गुरुवार दि. २९ जून २०२३ रोजी लाडू वाटप आणि मोफत नेत्र चिकित्सा शिबिर या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते - युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी अरविंद सावंत, सचिन अहिर, महेश सावंत, श्रध्दा जाधव, माधुरी मांजरेकर, दिलीप जाधव, पवन जाधव, भास्कर गद्रे, भटू अहिरे, सीमा लोकरे, स्वाती पोपट, विठ्ठल मोरे, महेश यादव, विकास भोसले यांच्यासह असंख्य निष्ठावंत शिवसैनिक, कार्यकर्ते व पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते.


Powered By Sangraha 9.0