संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून

01 Jul 2023 19:15:00
Monsoon Session of Parliament

नवी दिल्ली
: संसदेच्या पावसाळी अधिवेशनास येत्या २० जुलैपासून प्रारंभ होणार असून ते ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. संसदीय कामकाजाविषयक कॅबिनेट समितीने (सीसीपीए) अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीपीएच्या बैठकीमध्ये अधिवेशनाच्या तारखांवर अंतिम निर्णय घेण्यात आला.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, या २३ दिवसांच्या अधिवेशनात एकूण १७ बैठका होणार आहेत. अधिवेशन काळात सर्व पक्षांनी विधीमंडळ आणि संसदेच्या इतर कामकाजात रचनात्मक योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन जुन्या संसद भवनात सुरू होऊ शकते, परंतु मध्यभागी ते नवीन संसद भवनात हलवले जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, नव्या संसदेच्या उद्घाटनानंतर नव्या वास्तूत होणारे हे पहिलेच अधिवेशन ठरणार आहे.
 

Powered By Sangraha 9.0