शिवराजांच्या भूमीत धर्मांधांना थारा नाही! गृहमंत्र्यांच्या आदेशाने टीपूचे स्मारक जमीनदोस्त!

09 Jun 2023 17:37:44
 
Tipu Sultan Chowk
 
 
धुळे : वडजाई रोडवर एका चौकात बांधण्यात आलेले वादग्रस्त टिपू सुलतान चौकातील चबुतरा अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जमीनदोस्त करण्यात आले आहे. चबुतरा बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे संबंधित सह ठेकेदाराला हा चबुतरा स्वतःहून काढून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार हा चबुतरा काढून टाकण्यात आला.
 
या चौकाला टिपू सुलतानचे नामकरण देखील करण्यात आले होते. या प्रकारामुळे हिंदुत्ववादी संघटना धुळ्यात आक्रमक झाल्या. भारतीय जनता पार्टीने पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन चबुतरा आमदार फारुख शाह यांच्या सहकार्याने उभारण्याचा आरोप करीत त्यांच्या विरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करून हा चबुतरा तोडण्याची मागणी केली. या चौकाचे टिपू सुलतान नामकरण करताना महानगरपालिकेच्या कोणत्याही सभेत ठराव केला गेला नाही. मात्र तरीही बेकायदेशीरपणे चौकाचे नामकरण केले गेल्याचा आरोप यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला.
 
 
Powered By Sangraha 9.0