मुंबई : ठाकरे गटातील नेते आणि खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुनील राऊत यांच्या फोनवर ऑडिओ क्लिपद्वारे ही धमकी आली आहे. सकाळचा ९ भोंगा बंद करा. असे ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. बंदुकीने गोळ्या घालू असे धमकीमध्ये म्हटले आहे.
राऊत बंधुंना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या संबंधी देण्यात आलेल्या माहितीनुसार संजय राऊत यांनी सकाळी ९ वाजताचा भोंगा बंद करावा, त्यासाठी एक महिन्याचा वेळ देत असल्याचे या फोनवर सांगण्यात आले आहे. हा धमकीवजा फोन सुनील राऊत यांच्या फोनवर आला असून संबंधित व्यक्ती हिंदी भाषेत बोलत असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये संबंधित व्यक्ती वारंवार सकाळी नऊ वाजेचा भोंगा बंद करा, अशा इशारा देत होता, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.