मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये जितेंद्र आव्हाड बोलत आहेत की, २०११ मध्येच आपल्याला कोरोना येणार असल्याचे समजले होते, त्यामुळेच मी मुंब्र्यात कबरस्तान बांधायला घेतलं. तसेच जे काही होतं ते अल्लाहाला माहीत असतं, अल्लाहच्या कृपेने आपल्याला २०११ मध्येच समजले, कोरोना २०२० मध्ये येणार आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. आ. जितेंद्र आव्हाडांचा हा व्हिडीओ २०२१ मध्ये राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाचा व्हिडीओ आहे.