डिस्नी + हॉटस्टारची मोठी घोषणा

09 Jun 2023 16:45:07
Disney + Hotstar Free Streaming

मुंबई
: डिस्नी हॉटस्टारने आपल्या युझर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. विशेषतः क्रिकेट चाहत्यांसाठी ही घोषणा महत्त्वाची असून आशिया कप आणि आयसीसी मेन्स वर्ल्ड कपचे सामने आता मोफत पाहता येणार आहेत. याबाबत डिस्नी+ हॉटस्टारने याची माहिती दिली आहे. तसेच, ज्यांच्याकडे डिस्नी+हॉटस्टार आहे त्यांना दोन्ही स्पर्धा मोफत पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, आयपीएलच्या मोसमात जिओ सिनेमाने युझर्ससाठी अशाचप्रकारे मोफत आयपीएल सामने पाहण्याची सुविधा दिली होती. आता हॉटस्टारने त्याचधर्तीवर निर्णय घेत युझर्सना सुखद धक्का दिला आहे. दरम्यान, हॉटस्टार ही एक स्टार इंडियाची सहाय्यक कंपनी, नोवी डिजिटल एन्टरटेन्मेंटच्या मालकीची एक भारतीय ओव्हर-द-टॉप स्ट्रीमिंग सर्व्हिस आहे.


Powered By Sangraha 9.0