संजय राऊत,जितेंद्र आव्हाडांनी आपला 'डीएनए' तपासावा ! चित्रा वाघ

08 Jun 2023 18:41:43

image (13)



मुंबई :
अहिल्यादेवी होळकर नगरात दि. ६ जून रोजी औरंगजेबाचे फोटो नाचविण्यात आले. दि. ७ जून रोजी कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे, पोलिसांना येथे कर्फ्यू घोषित करावा लागला आहे. आज, दि. ८ जून रोजी इचलकरंजी येथेही औरंगजेबाचे असे स्टेटस ठेवले गेले. या सर्व घटनांवर बोलताना भाजपच्या चित्रा वाघ यांनी आपले परखड मत व्यक्त केले आहे.

"महाराष्ट्रात औरंगजेबाच्या औलादी अचानक वाढल्या आहेत. ज्यांनी याला जन्म दिला, त्या महाविकास आघाडीचा आणि औरंगजेबाचा नक्की एकच 'डीएनए' असणार. काही युवकांनी औरंगजेबाचा स्टेटस ठेवल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महाराष्ट्रात दंगा घडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे सर्व कट रचून केले जात आहे,याची लोकांना पूर्ण कल्पना आहे.'ये पब्लिक है सब जानती हैं'.महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे जितेंद्र आव्हाड ,संजय राऊत यांनी आपल्या 'डीएनए' ची तपासणी केली पाहिजे. मला राज्याचे 'गृहमंत्री' देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे,ते नक्कीच औरंगजेबाच्या औलादींना मुळापासून उखडून टाकतील." अशा परखड भाषेत त्यांनी आपले मत समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये मांडले आहे.















Powered By Sangraha 9.0