ॲड. संजय सावंत यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंञित सदस्य पदी निवड

08 Jun 2023 15:18:13
Adv. Sanjay Sawant BJP Maharashtra

मुंबई
: भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी संपर्क अभियान प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालय मुंबई येथे दि ०६ जुन २०२३ रोजी पार पाडला यावेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील पदाधिकार्याना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये अँड. संजय दत्तात्रय सावंत (पाटील) यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश निमंञित सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, ॲड. संजय सावंत पाटील हे गेली ३ वर्षापासुन भारतीय जनता पार्टी मध्ये पुणे जिल्हा कायदा आघाडी चे जिल्हाध्यक्ष, स्वच्छ भारत अभियान मध्ये महाराष्ट्र राज्यवर राज्य संघटन सरचिटणीस, शिरुर लोकसभा संयोजक समिती सभासद या सर्व जबाबदाऱ्यावर सध्या कार्यरत आहेत तसेच गेली १६ ते १७ वर्षापासुन सातत्याने वेगवेगळ्या सामाजिक संघटना सोबत महाराष्ट्राभर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य करत आले आहेत. तसेच, वकीली व्यवसाय करत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून होत आलेले आहे. अशाप्रकारे पार्टी मध्ये ॲड संजय सावंत पाटील यांनी आपली दिलेली जबाबदारी खुप चांगल्या पध्दतीने पार पाडत आहेत म्हणूनच प्रदेश कमिटी मध्ये भारतीय जनता पाटीने त्यांचा विचार केला असल्याचे बोलले जात आहे.

ॲड संजय सावंत पाटील यांची महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेश निमंञित सदस्य पदी निवड झाल्यानंतर ॲड सावंत पाटील यांनी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास दिला. सावंत म्हणाले, की अखंड महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधनी करत असताना महाराष्ट्र राज्यभर प्रवास करुन केंद्रसरकारच्या व राज्यसरकारच्या संपुर्ण योजना सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचण्याचा प्रयत्न करणार, जनजागृती करणार, तसेच पार्टीसाठी संघटनात्मक बांधणी मोठ्या प्रमाणात करणार अशी खाञी अॅड. संजय सावंत यांनी यावेळी दिली.

Powered By Sangraha 9.0