हिंदूंवरील अत्याचाराविरोधात भगवे वादळ धडकले

07 Jun 2023 07:56:25
Love Jihad March Sangamner

संगमनेर
: ‘लव्ह जिहाद’सारख्या वाढत्या घटनांसह विविध अत्याचाराविरोधात संगमनेरमध्ये मंगळवारी हिंदू समाज एकवटला होता. शहरातून भव्य स्वरुपात भगवा मोर्चा काढण्यात आला. या जमलेल्या हिंदू बांधवांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला होता. संगमनेरमध्ये सकाळीच काढण्यात आलेल्या या मोर्चाला ३५हजारांपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती होती. यात महिला तरुणींची संख्या लक्षणीय होती. तसेच, संगमनेर शहर आणि तालुक्यासह राहता तालुक्यातही स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला.

मोर्चानंतरदेखील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय विविध आस्थापना दिवसभर बंदच हिंदूंवरील अत्याचाराविरोधात भगवे वादळ धडकले होत्या. नगरपरिषदेसमोरून या भव्य भगवा मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा ज्यावेळी नवीन नगर रस्त्यावरील प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचला त्यावेळी त्याचे दुसरे टोक बाजारपेठेत होते. यावरून उपस्थितीचा अंदाज येतो. ३५हजारांवर नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चातील ‘जय जय सियाराम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी संगमनेर दणाणून गेले होते. समाजाच्या सर्व स्तरातील आणि सर्वपक्षीय नागरिक या मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

Powered By Sangraha 9.0