ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली सुरू होता धर्मांतराचा कट!

05 Jun 2023 19:21:09
ghaziabad-police-arrest-on-cleric-who-converted-under-guise-of-online-gaming


नवी दिल्ली
: दिल्लीजवळील गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दोन अल्पवयीन मुलांचे धर्मांतराचे विचित्र प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात त्या दोन मुलांचे ऑनलाइन गेमच्या नावाखाली धर्मांतर केलेच नाही तर त्यांना पाचवेळा नमाज पढायला लावले. हा प्रकार त्यांच्या घरच्यांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा खुलासा केला तेव्हा ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

डीसीपी सिटी निपुण अग्रवाल यांनी ऑनलाइन गेमच्या नावाखाली जैन समाजातील अल्पवयीन मुलगा आणि हिंदू मुलाच्या धर्मांतर प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, दोन्ही अल्पवयीन मुलांचे धर्मांतर केल्याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास केला असता त्यातील एक आरोपी गाझियाबादमधीलच मशिदीचा मौलवी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर दुसरा आरोपी मुंबईतील ठाण्यातील रहिवासी आहे. बद्दो उर्फ ​​शाहनवाज मकसूद खान असे त्याचे नाव आहे. आरोपीला अटक करून पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे.

ऑनलाइन गेमिंगद्वारे तरुणांचे धर्मांतर केल्याप्रकरणी पोलिसांनी गाझियाबाद सेक्टर २३ मशिदीतील मौलवी अब्दुल रहमान उर्फ ​​नन्नी याला अटक केली आहे. हा मौलवी गेल्या दोन वर्षांपासून या मशिदीत सेवा करत होता. त्यांनीच दोन्ही अल्पवयीन मुलांना धर्मांतराचे भाषण दिले.

ऑनलाइन गेमच्या नावाखाली धर्मांतर


पोलिसांनी सांगितले की, काही मुस्लीम मुले त्यांची नावे बदलून त्यांच्यासोबत ऑनलाइन गेम फॉर नाईट गेम अॅपवर गेम खेळत. गेम हरल्यावर त्यांना जिंकण्यासाठी झाकीर नाईकचे आयाते पठण करायला लावत. त्यानंतर त्यांचा विश्वास जिंकून यानंतर डिसकॉर्ड अॅपच्या माध्यमातून मुस्लीम मुले युजर आयडी बनवून हिंदू मुलांशी चॅट करत, त्यांना इस्लामिक रितीरिवाज अंगीकारण्यासाठी प्रवृत्त करत, भाषणे दाखवून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रोत्साहित करत आणि इस्लामची माहिती देत.

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल रहमानने दोन वर्षांपूर्वी या दोन मुलांची भेट घेतली होती, जे गेमिंग अॅपच्या गोंधळात पडून इस्लामकडे आकर्षित झाले होते. यानंतर त्यांनी तरुणांना सांगितले की, इस्लाम हा सर्वात महत्त्वाचा धर्म आहे. यानंतर आरोपीने दोन्ही मुलांना फसवण्यात यश मिळवले. त्यानंतर दोन्ही मुलांना पाच वेळा नमाज पठन करण्यात सांगितले. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.



Powered By Sangraha 9.0