एकेकाळी हिंदूराष्ट्र होतं नेपाळ; आज मुस्लीम ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत वाढ
05 Jun 2023 17:30:22
मुंबई : नेपाळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चनाच्या लोकसंख्येत वाढ झाल्याचे समारे आले आहे. नेपाळमध्ये २०२१ मध्ये जणगणना करण्यात आली होती. त्या जणगणनेचे तपशील आता समोर आले आहेत. त्या तपशीलानुसार, नेपाळमधील जाती आणि विविध जमातींची संख्या १४२ च्या पुढे गेली आहे. २०११ च्या जणगणनेत जाती आणि जमाती यांची संख्या १२५ होती ती आता १४२ च्या पुढे गेल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, नेपाळच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. हे पूर्वी 'सेंट्रल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स' म्हणून ओळखले जात होते. संस्थेने नेपाळमधील जाती, भाषा आणि धर्मांबाबतच्या प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत. त्यानुसार, नेपाळमध्ये सध्या २ कोटीहून अधिक हिंदू आहेत तर मुस्लिमांची संख्या २३ लाखांच्या दरम्यान आहे. तसेच, नेपाळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चनांची लोकसंख्या वाढली, हिंदू आणि बौद्ध कमी झाले: नवीन जनगणनेचे आकडे आले, लोक सर्वात जास्त नेपाळी-मैथिली बोलतात.
दरम्यान, नेपाळमध्ये सर्वाधिक बोलली जाणाऱ्या भाषा या पुढीलप्रमाणे आहेत. नेपाळमध्ये ४४.८ टक्के लोकं नेपाळी बोलतात तर मैथिली ११.०५ टक्के लोक बोलतात. तर ६.२४% लोक भोजपुरी बोलतात. त्याचप्रमाणे थारू ही ५.८८%, तमांग ४.८८%, बज्जिका ३.८९% आणि अवधी २.९६% लोकांची भाषा आहे. जोपर्यंत धर्मांचा संबंध आहे, नेपाळमध्ये अजूनही ८१ टक्के हिंदू आहेत. तर ८.२१ टक्के अनुयायांसह बौद्ध धर्म दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथेही इस्लामचा प्रसार होत असून मुस्लिमांची लोकसंख्या ५.०९% झाली आहे.