महाराष्ट्र पुन्हा नंबर वन; फडणवीसांचा मविआवर निशाणा

05 Jun 2023 20:14:51
Devendra Fadnavis FDI Maharashtra

मुंबई
: “होय, पुन्हा एकदा एफडीआयमध्ये महाराष्ट्र नंबर 1! आम्ही सातत्यानं सांगत होतो की, खंडणी, वसुली, भ्रष्टाचाराचा महाविकास आघाडीचा काळ संपवून राज्यात नवं सरकार आलं आहे. आता महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ वाढणार आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर वन होणार,” या आशयाचे ट्विट उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं असून त्यातून त्यांनी तत्कालीन मविआ सरकारवर निशाना साधला आहे.

‘महाराष्ट्र पुन्हा नंबरवन’ या आशयाच्या ट्विटनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणाही साधला आहे. डीआयपीपी (औद्योगिक नीती आणि संवर्धन विभाग) ने जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीचा प्रसिध्द केलेल्या अहवालात महाराष्ट्र सर्वाधिक एफडीआय (परकीय गुंतवणूक) प्राप्त करणारं राज्य ठरलं आहे. यामध्ये २९ टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून, कर्नाटक २४ टक्क्यांसह दुसर्‍या तर गुजरात १७ टक्क्यांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.


Powered By Sangraha 9.0