दंत आरोग्य आणि सकारात्मकतेचे हास्य

05 Jun 2023 20:52:53
Article On Dental Health

सकारात्मक विचार करण्याची शक्ती तुमच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे पैलू बदलू शकते आणि अभ्यास दर्शवितो की, आशावादी असण्यामुळे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात. सकारात्मक विचारसरणीमुळे दातांचे आरोग्यही सुधारणे शक्य आहे का? सकारात्मक राहण्याचा तुमच्या दातांवर उत्तम परिणाम होऊ शकतो, हे दाखवणारी संशोधने झालेली आहेत.

जगभरातील जवळपास साडेतीन अब्ज लोक मौखिक आजारांनी ग्रस्त आहेत. बहुतेक लोक मग ते जगात कुठेही राहोत किंवा त्यांचे शिक्षण किंवा उत्पन्नाची पातळी काय आहे, हे माहीत नाही, पण यासंदर्भातील आकडेवारी थक्क करणारी आहे. मौखिक आरोग्याचा आपल्या एकूण आरोग्यावर कसा परिणाम होतो, हेही लोकांना माहीत नाही. परंतु, महत्त्वाचे सत्य हे आहे की, तोंडात होणारे हे रोग इतर आरोग्य परिस्थितींचा धोका वाढवू शकतात आणि मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि श्वसन रोग आणि काही कर्करोगाशी संबंधित आहेत.

तुमचे तोंड हे तुमच्या संपूर्ण आरोग्याचे आणि शारीरिक कल्याणाचे प्रवेशद्वार आहे. जगातील सर्वात प्रचलित रोग हा दातांमधील पोकळी आहे. अंदाजे २.३ अब्ज लोक दात किडण्याने ग्रस्त असल्याने सर्व वयोगटातील लोकांना वेदना आणि त्रास होऊ शकतो. प्रौढांमध्ये दात गळण्याचे प्रमुख कारण म्हणून, ‘पीरियडॉन्टल’ रोग, अनेकदा मनाची शांत स्थिती, चघळण्याची क्षमता, सौंदर्यशास्त्र, आत्मविश्वास या आपल्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे प्रमुख पैलू, यांच्याशी तडजोड करू शकते.

तोंडाचे आजार केवळ तुमच्या तोंडाला हानी पोहोचवत नाहीत, तर ते खराब मौखिक आरोग्य मानसिक आरोग्याशीदेखील जोडलेले आहे. कित्येक वर्षांचे संशोधन दर्शविते की, दातांतील पोकळीमुळे चिंता आणि पेच निर्माण होऊ शकतो. आवश्यक ज्ञान आणि साधनांसह, उज्ज्वल, निरोगी भविष्यासाठी लोकांनी त्यांच्या तोंडी आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे. सकारात्मक विचार करण्याची शक्ती तुमच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे पैलू बदलू शकते आणि अभ्यास दर्शवितो की, आशावादी असण्यामुळे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात. सकारात्मक विचारसरणीमुळे दातांचे आरोग्यही सुधारणे शक्य आहे का? सकारात्मक राहण्याचा तुमच्या दातांवर उत्तम परिणाम होऊ शकतो, हे दाखवणारी संशोधने झालेली आहेत.

उत्कृष्ट दंतचिकित्सा प्रदान करताना मन आणि शरीर कसे जोडलेले आहेत, हे समजणे आवश्यक आहे?संशोधनात असे दिसून आले आहे की, नकारात्मक मानसिकता दृश्य मेंदूवर वा ‘व्हिज्युअल कॉर्टेक्स’वर (मेंदूचा भाग जो मिळालेल्या दृश्य माहितीवर प्रक्रिया करतो त्यावर) परिणाम करू शकते. नकारात्मक वृत्तीमुळे एखाद्याच्या भावनिक स्थितीशी संबंधित नसलेली संवेदी माहिती दडपली जाऊ शकते. त्याला ‘भावनिक गेटिंग’ म्हणून ओळखतात. सोप्या शब्दांत सांगायचे तर, जेव्हा एखादी व्यक्ती नकारात्मक मानसिकतेत असते, तेव्हा त्यांचा मेंदू त्यांच्या नकारात्मक भावनांना विरोध करणारी माहिती ‘फिल्टर’ करू शकतो, ज्यामुळे वास्तवाबद्दल विकृत धारणा होऊ शकते. उदाहरणार्थ, नकारात्मक मानसिकतेतील एखाद्या व्यक्तीला तटस्थ चेहर्‍यावरील भाव हानिकारक दिसण्याची अधिक शक्यता असते. तणाव जाणवणे ही स्थिती नेहमीच्या चिंतीत मानसिक स्थितीपेक्षा जास्त आहे.

याचा तुमच्या आरोग्यावर खूप वास्तविक शारीरिक प्रभाव पडतो आणि त्यामुळे हिरड्या आणि इतर मऊ ऊतींना दीर्घकाळ जळजळ होऊ शकते. ‘स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोल’ची पातळी आणि गंभीर हिरड्यांच्या रोग यांच्यातील महत्त्वपूर्ण संबंध अभ्यासांनी दर्शविला आहे. जीवनातील नकारात्मक घटना ज्यामुळे तणाव किंवा नैराश्याची भावना निर्माण होते, ते हिरड्यांचे आजार होण्याचे महत्त्वाचे जोखीम घटक असू शकतात. निरोगी, सकारात्मक जीवनशैलीद्वारे तणाव पातळी कमी करणे आणि त्यायोगे जळजळ होण्याची लक्षणे कमी करणे आपल्या हिरड्यांचे आरोग्य सुधारू शकते. नैराश्याच्या भावनांमुळे तुमची स्वतःची सामान्य काळजी घेण्यासह अगदी मूलभूत दैनंदिन कामेदेखील करण्याची प्रेरणा कमी होते. नैराश्य तुमची ऊर्जा पातळी कमी करते आणि तुम्हाला निराशेची भावना देते. ‘ब्रशिंग’ आणि ‘फ्लॉसिंग’सारख्या रोजच्या दिनचर्या काहीसे निरर्थक वाटू शकतात. अधिक सकारात्मक दृष्टिकोन असल्याने तुम्हाला अधिक ऊर्जा मिळू शकते आणि स्वत:ची काळजी घेतल्यानंतर तुम्हाला किती बरे वाटते, याची जाणीव होते.

सकारात्मक राहणे हा मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि आपल्या दंत आरोग्यासाठी त्यामुळे होणारे फायदे महत्त्वपूर्ण आहेत. आपले दात चांगल्या स्थितीत राहतील, याची खात्री करण्यासाठी नियमित दंत स्वच्छता आणि तपासणीचे वेळापत्रक करणेदेखील महत्त्वाचे आहे. बरेच लोक त्यांच्या दंतवैद्याकडे जाण्यास घाबरतात. कारण, त्यांना त्यांच्या दातांच्या घाणेरड्या स्थितीबद्दल लाज वाटते. असे असल्यास, स्वतःला आठवण करून द्या की, तुमच्या दंतचिकित्सकाने खूप वाईट दात पाहिले आहेत. शिवाय, आजारी दात ठीक करणे हे त्यांचे काम आहे. आपल्या लाजिरवाण्या दातांच्या समस्यांपासून मुक्त होण्याची ही चांगली संधी आहे. जर तुम्हाला भीती वाटत असेल की, आपला हा अनुभव वेदनादायक असेल, तर प्रक्रियेदरम्यान तुम्हाला शक्य तितक्या कमी वेदना झाल्याची खात्री करणे, हे तुमच्या दंतवैद्याच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक आहे. स्वतःला आठवण करून द्या की, जर तुम्ही तुमच्या दातांच्या समस्यांची आत्ताच काळजी घेतली नाही, तर त्या खूप वाईट होतील आणि अधिक वेदनादायक होतील.

तुमच्या शरीराची आणि मनाची काळजी घेतल्याने चांगले दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. अभ्यासाने चिंताग्रस्त किंवा नैराश्यग्रस्त रुग्णांमध्ये आणि दातांमधील पोकळी किंवा हिरड्याच्या आजारामुळे दात गळणे यांच्यातील संबंध दर्शविला आहे. नवीन संशोधनात, ज्यामध्ये ५४ ते ८६ वयोगटातील ६५ हजार पोस्ट-मेनोपॉझल महिलांच्या आरोग्याचे परीक्षण केले गेले. ज्यांना हिरड्यांच्या आजाराचा इतिहास आहे त्यांना कर्करोग होण्याची शक्यता १४ टक्के अधिक असल्याचे आढळले. यापैकी तीनपैकी एकाला स्तनाचा कर्करोग झाला, तर इतरांना फुफ्फुसाचा कर्करोग, अन्ननलिका, पित्त मूत्राशय आणि त्वचेच्या कर्करोगाचा धोकाही खूप वाढला होता. ज्यांच्या हिरड्या निरोगी आहेत, त्यांना ‘अल्झायमर’ रोग होण्याची शक्यता ७० टक्के कमी असते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक तंदुरूस्त आणि निरोगी राहतात, त्यांना धोकादायक हिरड्यांचा संसर्ग होण्याची शक्यता ४० टक्के कमी असते.

यात असेही आढळून आले की, व्यायाम न करणे, शरीराचे सामान्य वजन न ठेवणे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे एखाद्या व्यक्तीला हिरड्यांचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास चांगली मौखिक काळजी घेण्याकडे आणि परिश्रमपूर्वक स्व-काळजीच्या दिनचर्येकडेलक्ष दिला जातो. जास्त प्रमाणात प्लेक तयार होण्यास प्रतिबंध होतो, हिरड्यांचे आरोग्य सुधारते आणि पोकळी निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते. तुमच्या निरोगी सुंदर दातांचा, तसेच तुमच्या उर्वरित आरोग्यमय शरीराचा अभिमान बाळगल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होऊ शकतात. संशोधनात असे आढळून आले आहे की, आपल्या दातांच्या संख्येचा आपण किती दिवस जगू याच्याशी घट्ट संबंध आहे. वयाच्या ७०व्या वर्षी २० किंवा त्याहून अधिक दात असलेल्यांना २० पेक्षा कमी दात असलेल्या लोकांपेक्षा जास्त काळ जगण्याची शक्यता जास्त असते. आयुष्य छोटे आहे. दात राखून हसायची सवय विकसित करा आणि प्रसन्न राहा!

डॉ. शुभांगी पारकर
Powered By Sangraha 9.0