ओडिशा रेल्वे अपघातानंतर वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पणही रद्द!

03 Jun 2023 12:09:48
 
Odisha train accident
 
 
भुवनेश्वर : ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघाताचा थेट परिणाम वंदे भारत एक्स्प्रेसवरही झाला असून, 3 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेनचा लोकार्पण सोहळाही रद्द करण्यात आला आहे. ओडिशा रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मडगाव ते सीएसएमटी या मार्गावर ही रेल्वे धावणं अपेक्षित होतं.
 
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २८८ आहे तर जखमींचा आकडा ९०० च्या पुढे आहे. जखमींवर वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णालयं आणि प्रथमोपचार केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत. हा रेल्वे अपघात इतका भयंकर होता की त्याचे थेट परिणाम भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकावर झाले असून, रेल्वेचं वेळापत्रकच कोलमडलं आहे.
 
दरम्यान, रेल्वे अपघात स्थळी पंतप्रधान मोदी भेट देण्याची शक्यता आहे. कटक येथील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची पंतप्रधान मोदी भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0