महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्फ मध्ये करार, ५ हजार कोटीची गुंतवणुक!

03 Jun 2023 12:18:07
 
Devendra Fadnavis
 
 
मुंबई : "महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) यांच्यात पुण्यात ३ जून रोजी करार झाला आहे. या कराराच्या माध्यमातून बजाज फिनसर्व्ह पुण्यात जवळपास ५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. यातून ४० हजार रोजगार तयार होणार आहेत. नजीकच्या काळातील महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे." अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
यावेळी त्यांनी ओडिशा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "ओडिशा मध्ये रेल्वेचा दुर्दैवी अपघात झाला आहे जे लोक मृत्यू मुखी पडले त्यांच्या परिवारसोबत आम्ही आहोत. जे लोक जखमी आहेत त्यांना आरोग्य लाभ व्हावा यासाठी प्रार्थना करतो."
 
लव्ह जिहादचे अनेक प्रकरण समोर येत आहेत. लव्ह जिहादबद्दल सरकार गंभीर आहे. त्याबद्दल सरकार अभ्यास करत आहे. बेपत्ता महिलांच्या तक्रारींबाबत आम्ही सतर्क आहोत. लव्ह जिहादवर कायदा करण्यासाठी आमचं संशोधन सुरु आहे. शिवाय, गृहखात चाईल्ड ट्राफिकिंबद्दल संवेदनशील आहे. जेवढी कारवाई महाराष्ट्रात झाली तितकी कुठेही झालेली नाही. अशी माहिती फडणवीसांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0