औरंगजेबाचा 'न विसरता' येणारा इतिहास

    29-Jun-2023
Total Views |
prakash amedkar
 
राज्यात सध्या काही मंडळीकडून धर्माध औरंगजेबाचे उदात्तीकरण चालू आहे. ही मंडळी राज्यात धार्मिक तेढ वाढवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायंत. आता त्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही सामील झालेत. काही दिवसांपुर्वीच औरंगजेबाच्या थडग्यावर भेट दिल्याचा त्यांचा व्हिडीओ संपुर्ण महाराष्ट्राने पाहिला तर काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी औरंगजेबाचा इतिहास विसरुन चालणार नाही असं भाष्य केलं. नक्कीच औरंगजेबाने दिल्लीची गादी ५० वर्ष काबीज केली होती. त्यामुळे अशा माणसांचा इतिहास विसरुन चालणार नाहिचं. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचे म्हणणे एकाअर्थी बरोबरही असेल. यानिमित्ताने आपण या लेखात औरंगजेबाच्या इतिहासावर एक नजर टाकूया.
 
विषयाची सुरूवात करण्याआधी, एक कहाणी ऐका. एक राजकुमार जो भारतातील मुगल सत्तेचा वारसदार होता. एक कवी, अध्येता, सुफी विचार मानणारा माणूस अशी त्यांची ख्याती देशभरात होती. तो धर्माने जरी मुस्लीम असला तरी त्याला हिंदू धर्मांचा अभ्यास होता. तो दानशुर होता. बादशाहाचाही तो आवडता शहजादा होता. त्याच्या लग्नाविषयी सांगितलं जातं की त्यांचं लग्न हे मुगल इतिहासातील सर्वात महागडं लग्न होतं. पण काही दिवसांनंतरच दिवस पालटले आणि त्यांची काय अवस्था झाली हे आपण त्याकाळात भारतात आलेला फ्रेंच प्रवासी फ़्राँसुआ बर्नियर यांच्या शब्दात ऐकू,
 
त्या शहजाद्याला एका लहान हत्तीच्या पाठीवर बसवण्यात आलं. जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्याच्या वारसदाराचा फाटक्या कपड्यात आपल्याच लोकांसमोर अपमान केला जात होता. त्याच्या डोक्यावर रंगीबेरंगी पगडी बांधलेली होती आणि त्याच्या गळ्यात कोणतेही दागिने नव्हते. बर्नियरने पुढे लिहिले आहे, "त्याचे पाय साखळदंडाने बांधलेले होते, ऑगस्टच्या कडक उन्हात, दिल्लीच्या रस्त्यांवर तोकड्या कपड्यात त्याची परेड झाली जिथे त्याचा बोलबाला होता. यादरम्यान त्याने क्षणभरही डोळे वर केले नाहीत आणि झाडाच्या फांद्यासारखा बसून राहिला. त्याची अवस्था पाहून दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या लोकांचे डोळे भरून आले. आता तुम्हाला वाटेल कोण होता हा राजकुमार आणि कोणी केली होती त्यांची ही अवस्था. तर तो राजकुमार होता शाहजानचा पुत्र दाराशुको आणि त्याची ही अवस्था केली होती त्याच्याच लहान भाऊ असलेल्या औरंगजेबाने. स्वत: गादीवर बसण्यासाठी आपल्या भावाला मारण्यात काही जणांना गैर वाटणार नाही. पण औरंगजेबाने आपल्या वडिल भावाची हत्या ही फक्त गादीसाठी नाहीतर त्यांने केलेल्या इशनिंदेसाठी केली. इशनिंदा म्हणजे इस्लामचा अपमान. काय केलं होतं, दाराशुकोने. इस्लाम आणि हिंदू धर्माला बरोबरीच मानलं होतं. आणि हेचं धर्माध औरंगजेबाला डोळ्यात खुपणार होतं.
 
अनेक लोकांनी औरंगजेब हा सेक्युलर राजा असल्याचा जावई शोध लावलेला आहे. पण औरंगजेब किती सेक्युलर होता हे पाहण्यासाठी आपण त्याचं हे पत्र वाचू,आपल्या पत्रात औरंगजेब म्हणतो, "अगर मेरा भाई तख़्तनशीं हुआ, तो हिंदुस्तान में मुहम्मद का धर्म दब जाएगा, बादशाहत बर्बाद हो जायेगी, मेरे पिता का शासन रहता तो उनके बुरे शासन के कारण ऐसा जरूर होता | इन्हीं वजहों से मैंने मजबूती से विरोध किया और अपनी जगह लेने की बाकी लोगों की कोशिशों के मामले में स्वार्थी होकर कुछ नहीं किया" आता विचार करा. जो माणूस आपल्या सत्तेला वैध ठरवण्यासाठी धर्माची ग्वाही देतो. तो कोणत्या अंगाने सेक्यलुर असेल.
 
आता दुसऱ्या एका पत्रातील मजकूर ऐका, ' यावेळी मी 'जिहाद' करत आहे आणि दृष्ट काफरांचा नायनाट करण्यासाठी अखंड परीश्रम करीत आहे. धर्माचा अभिमान असणाऱ्या प्रत्येक मुसलमानाने यावेळी जिहादीत गुंतलेल्या आपल्या बादशहाला मदत केली पाहिजे." हे पत्र औरंगजेबाने इ.स. १७०१ मध्ये गुजरात मधील एका सुभेदाराला लिहीले होते. यावरुन तर तुम्हाला नक्कीचं औरंगजेब किती सेक्युलर होता हे लक्षात येईल.
 
औरंगजेबाने काशी मथुरा सारख्या हिंदूच्या पवित्र धार्मिक स्थळांना पाडण्यासाठी शाही फर्मान काढले होते. एवढचं काय तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाच्या मंदिराला, जेजुरीच्या खंडरायाच्या मंदिरालाही त्याने नुकसान पोहचवले होते, असे ऐतिहासिक दाखले आहेत.
 
स्वत:च्या बापाला कैदेत ठेवणारा, आपल्याचं लहान बहिणीची विष पाजून हत्या करणारा औरंगजेब महाराष्ट्रात अचानक काही लोकांना दयाळू वाटत आहे. औरंगजेबाने केलेली छत्रपती संभाजी महाराजांची हत्या तर हा महाराष्ट्र कधीच विसरु शकणार नाही. शीख संप्रदायाचे नववे गुरु, "गुरु तेग बहादूर". यांची हत्या पण ओरंगजेबाच्या आदेशानुसार चांदणी चौकात करण्यात आली होती. याला कारण होत, "गुरु तेग बहादूर" यांचा इस्लाम स्विकारण्यास असलेला नकार.
 
ओरंगजेबाचा हा सर्व इतिहास त्याचं स्टेटस ठेवणाऱ्यांनी वाचला असेल यांची शक्यता कमीच.पण या धर्मांध लोकांचा फक्त आपल्या मतपेटीसाठी वापर करणाऱ्या नेत्यांनी तरी वाचला असेल अशी आशा आहे. पण त्यांना इतिहासाशी काही देणंघेणं नाही असचं वाटतयं. ते आपल्या मतपेटीच्या राजकारणात इतके आंधळे झालेत की त्यांना काही दिसतचं नाहिये.
श्रेयश खरात