सरसंघचालकांच्या उपस्थितीत होणार 'सेतुबंध'चा प्रकाशन सोहळा

28 Jun 2023 20:34:28
RSS

मुंबई
: पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्व. राजाभाऊ नेने लिखित 'सेतुबंध' या गुजराती ग्रंथाची मराठी आवृत्ती उपलब्ध झालेली आहे. या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. मंगळवार, दि. ४ जुलै रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरिमन पॉईंट येथे संध्याकाळी ६ वाजता हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला असून उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक हे प्रमुख पाहुणे तर ज्येष्ठ स्वयंसेवक बिमल केडिया यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती राहणार आहे.

 
Powered By Sangraha 9.0