पुण्यातील घटनेनंतर पोलिसांचा 'हा' मोठा निर्णय!

28 Jun 2023 15:04:34

Pune Police 
 
 
पुणे : सदाशिव पेठ परिसरात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यातच काही दिवसांपुर्वी दर्शना पवार ही एमपीएससीला राज्यात सहावी आली होती. तिची ही हत्या करण्यात आली. या सर्व पार्श्वभुमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आली आहे. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
 
शहरातील सर्व पोलीस चौक्या 24 तास आणि सातही दिवस सुरू ठेवण्याचा पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पोलीस चौकी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय अजून 150 बीट मार्शल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील 25 बीट मार्शल दामिनी पथकासाठी असणार आहेत. याशिवाय कोणत्याही तक्रारीकडे कानाडोळा न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0