आदित्य ठाकरेंच्या गाडीला अपघात!

28 Jun 2023 17:25:33
 
Aditya Thackeray accident
 
 
मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईकस्वाराने धडक दिली आहे. आदित्य ठाकरे शिवसेना भवनमध्ये येत असताना गाडीच्या मागून आलेली बाईक त्यांच्या चारचाकीला धडकली. शिवसेना भवनच्या सिग्नलच्या पुढे येऊन आदित्य ठाकरे शिवसेना भवनच्या उजव्या बाजूला वळण घेत होते, तेव्हा अचानक वेगाने आलेल्या बाईकने पुढच्या चाकाजवळ धडक दिली.
 

Aditya Thackeray accident 
 
शिवसेना भवनमध्ये आल्यानंतर त्यांनी शाखाप्रमुखांना त्या बाईकस्वाराची विचारपूस करायला सांगितली. तसंच धडक दिल्यानंतर ट्रॅफिक पोलीस, पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी या बाईकस्वाराला बाजूला घेतलं. सुदैवाने यात कोणती हानी झाली नाही.
 
  
Aditya Thackeray accident
 
Powered By Sangraha 9.0