महिलेला ड्रग्सचे इंजेक्शन देऊन सामुहिक बलात्कार; डॉ.शाकिबला अटक, जकी फरार!

27 Jun 2023 11:13:21
uttar-pradesh-ghaziabad-khora-doctor-gang-rape-woman-patient-in-family-clinic

लखनऊ : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील खोडा येथील एका क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेलेल्या महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरांनी पीडित महिलेला ड्रग्सचे इंजेक्शन देऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपी डॉक्टरांपैकी एक शाकिब याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्यांचा सहकारी डॉ. जकी यांचा शोध पोलीसांकडून सुरू आहे. ही घटना १९ जून रोजी २०२३ ला घडली. मात्र २५ जून रोजी पीडितेने पोलीसांना या प्रकरणाबाबत तक्रार दिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. दरम्यान पीडितेने तक्रार केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही आरोपीने दिली होती.

अलीगढमधून बीएचएमएसची पदवी घेतलेल्या डॉ. शाकिबने खोडा पोलीस स्टेशन परिसरात फॅमिली क्लिनिक उघडले आहे. दिल्लीच्या रोहिणी भागातील एका महिलेला कोणीतरी डॉक्टर शाकिबबद्दल सांगितले. महिलेने डॉ. शाकिबला फोन केला असता, त्याने तिला उपचाराचे आश्वासन दिले आणि ७ जून रोजी तिला क्लिनिकमध्ये बोलावले.




पहिल्यांदा दिलेल्या औषधाचा महिलेला फायदा झाला नाही.त्यामुळे १९ जून रोजी शाकिबच्या खोडा येथील फॅमिली क्लिनिकमध्ये गेली. या दिवशी शाकिबने महिलेला ड्रग्सचे इंजेक्शन दिले, असा आरोप महिलेने केला आहे. नंतर सहकारी डॉक्टर जकीसोबत शाकिबने महिलेवर बलात्कार केला. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने स्वतःला नग्नावस्थेत पाहिले. यादरम्यान शाकिबने महिलेचे अश्लील व्हिडिओ बनवले होते. तसेच तक्रार केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी शाकिबने महिलेला दिली.

सुरुवातीला पीडित तरुणी भीतीने गप्प राहिली. मात्र २५ जून रोजी पीडितेने धाडस दाखवून शाकिब आणि जकीविरूद्ध खोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गँगरेपसह अन्य कलमांत एफआयआर नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी फरार झाले. खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी डॉ. शाकिबला २६ जून रोजी खोडा येथून अटक केली. मात्र दुसरा आरोपी जकी अद्याप फरार आहे.



 
याआधी बरेली येथील डॉ. एम. खान रुग्णालयात जिभेच्या उपचारासाठी दाखल असलेल्या डॉ. जावेद या तीन वर्षांच्या हिंदू मुलाची सुंता केल्याचे प्रकरण समोर आले होते. ऑपरेशननंतर मुलाला वॉर्डात आणले असता त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली. बरेली जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. प्रथमदर्शनी चौकशी समितीने हिंदू बालकांच्या खतना प्रकरणात रुग्णालयाला दोषी ठरवले आहे. या आधारे रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
 

Powered By Sangraha 9.0