अनधिकृत बांधकामाना उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद!

27 Jun 2023 13:35:50

thackeray 
 
 
मुंबई: सर्व अनधिकृत बांधकामाना उद्धव ठाकरेचा आशीर्वाद होता, ज्यांनी ज्यांनी अधिकाऱ्यांवर हात उचलला त्यांच्यावर कारवाई होणारच आहे, असा घणाघात आमदार नितेश राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट व्हावी, अशी मागणी ही राणेंनी केली आहे. जे जे उद्धव ठाकरेंशी निगडित आहेत त्यांना दंगली घडवायचा प्रयत्न आहे. असं ही त्यांनी म्हटलं आहे.
 
प्रकाश आंबेडकर यांच्यावरुन ठाकरेंना सवाल करताना नितेश राणे म्हणाले, "जे हिंदूंची बदनामी करतात. छत्रपतींची बदनामी करतात त्यांच्यासोबत तुम्ही युती करता? याच उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं. प्रकाश आंबेडर यांच्यासोबत आम्ही मांडीला मांडी लावून बसत नाही जे त्यांच्या सोबत बसतात त्यांना विचारा की तुम्हाला शिवरायांचा अवमान तुम्हाला चालतो का? संजय राऊत शुद्धीत आहे का? तू तुझ्या मालकाचा पक्ष आणि मुलगा हे भाजपसोबत असताना इतर राज्यात निवडणुका लढविल्या आहेत. काल शाखा तोडली त्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी आरडाओरड केली. पालिका अधिकाऱ्यांनी फोटो तोडण्याअगोदर काढण्याची परवानगी दिली होती."
 
"लोकांची घरे तोडलीत तुम्हाला आठवण आहे का? की तुम्ही गजनी झालात? सर्वात मोठा नीXX मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसतो. स्वतःच्या घराबद्धल विचार केला मग शाखांचा विचार का नाही केला त्या नियमित का नाही केल्या? ज्या भागात मातोश्री आहे. त्याच विभागात महिला भगिनींना पाण्यासाठी मोर्चा काढावा लागतो ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. त्या सर्व अनधिकृत बांधकामाना उद्धव ठाकरेचा आशीर्वाद होता का? ज्यांनी ज्यांनी अधिकाऱ्यांवर हात उचलला त्यांच्यावर कारवाई होणारच आहे." असा हल्लाबोल राणेंनी केला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0