मंचर मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने कडकडीत बंद!

24 Jun 2023 17:39:38

Manchar 
 
 
पुणे :
मंचर 
मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद ची हाक देण्यात आली आहे. लव जिहाद, गोहत्या, धर्मांतर याकडे लक्ष वेधण्यासाठी आंबेगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने मंचर शहर बंदला व्यावासायाकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंचर शहरातून पथसंचलन केले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ड्रोनद्वारे संपूर्ण शहरावर नजरही असणार आहे.
 
मंचर शहरात कायदा, सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आव्हान खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारतळ, श्रीराम मंदिर, अवलिया दर्गा, छत्रपती संभाजी महाराज चौकमार्गे पोलिसांनी पथसंचलन केले. वाहनांची व बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0