बोईंग करणार भारतात ८२० कोटी रुपयांची गुंतवणूक!

23 Jun 2023 18:18:08
Boeing
 
नवी दिल्ली : विमान निर्माती कंपनी बोईंग भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे. बोईंगच्या गुंतवणूकीमुळे देशातील विमान वाहतूक उद्योगालाही गती मिळण्यास मदत होणार आहे. विमान निर्माती कंपनी भारतात १०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ८२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी अमेरिकेत असतांनाच बोईंगने ही घोषणा केली आहे.
 
बोईंगची ही गुंतवणूक वैमानिकांना प्रशिकक्षण देण्यासाठी खर्च केली जाणार आहे. सध्या भारतात कुशल वैमानिकांची मागणी झपाट्याने वाढत आहे. पुढील २० वर्षांत देशाला सुमारे ३१,००० नवीन वैमानिकांची गरज भासणार आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यात बोईंग महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
 
एअर इंडियाने अलीकडेच बोईंगला ४०० पैक्षा जास्त नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे. अशा परिस्थितीत कंपनीला यासाठी प्रशिक्षित वैमानिकांचीही गरज भासणार आहे. यासाठीच बोईंग भारतात गुंतवणूक करत आहे. काही दिवसांपुर्वीच भारतातील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी इंडिगोने एअरबसला ५०० नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे.
Powered By Sangraha 9.0