वॉशिंग्टन येथे पंतप्रधान मोदींचे वरूण राजाने केले जंगी स्वागत !

22 Jun 2023 14:30:59
pm-modi-us-visit-guard-of-owner-at-washington-andrews-airport-rain-national-anthem

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्कहून वॉशिंग्टनला पोहोचले. त्यावेळी तिथे जोरदार पावसांने पंतप्रधानांचे जंगी स्वागत केले. मुसळधार पावसात वॉशिंग्टन डीसीच्या जॉइंट बेस अँड्र्यूज विमानतळावर मोदींचे सन्मानाने स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान पावसात भिजत राहिले आणि भारताचे राष्ट्रगीत मागे वाजत होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत हँडलवरून २ मिनिटे ११ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तुम्हाला दिसत आहे की, खराब हवामान असतानाही पीएम मोदी विमानातून बाहेर पडतात. त्यावेळी अमेरिकन अधिकारी त्यांचे स्वागत करतात. त्यावेळी मोंदीना गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. भारताचे राष्ट्रगीत वाजवले जाते. यावेळी पावसात भिजताना पंतप्रधान सावधान मुद्रेत उभे आहेत.

पंतप्रधान मोदी यांचा नऊ वर्षांतील हा सहावा अमेरिका दौरा आहे. मात्र ते प्रथमच राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून राज्य दौऱ्याचे निमंत्रण आले. मनमोहन सिंग यांच्यानंतर अमेरिकेच्या राज्य दौऱ्यावर जाणारे ते दुसरे भारतीय पंतप्रधान म्हणून आता मोदींच नाव घेतलं जाणार आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. असे करणारे ते एकमेव भारतीय नेते आहेत.
 
विशेष म्हणजे न्यूयॉर्कमध्ये उतरल्यानंतर पंतप्रधानांनी अमेरिकन उद्योगपती, विचारवंत आणि तज्ज्ञांचीही भेट घेतली. यामध्ये टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांचा समावेश होता. या बैठकीनंतर मस्क यांनी स्वत:ला पंतप्रधान मोदींचे चाहते असल्याचे सांगून पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले होते. यासोबतच पुढील वर्षी टेस्लाचे युनिट भारतात सुरू करण्याची चर्चा झाली. यानंतर, वॉशिंग्टनला पोहोचलेल्या पंतप्रधानांना दि. २१ जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये बायडेन दाम्पत्यांसोबत डिनर केला.
 
यावेळी पंतप्रधान मोदींनी बिडेन दाम्पत्याला अनेक भेटवस्तू दिल्या. यामध्ये गणपतीच्या मूर्ती, ग्रीन डायमंडचा अशा गोष्टींचा समावेश आहे. १० भेटवस्तूसह देणग्या असलेली एक विशेष पेटी सुपूर्द केली. पंतप्रधानांनी फर्स्ट लेडी जिल बायडन यांना ७.५ कॅरेटचा पर्यावरणपूरक 'ग्रीन डायमंड' भेट दिला. त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष बायडन यांना 'उपनिषदची १० तत्त्वे' हे पुस्तक दिले. जयपूरच्या कारागिरांनी म्हैसूरच्या चंदनापासून बनवलेला खास गिफ्ट बॉक्स दिला. त्यात गणपतीची मूर्ती आणि एक दिवा याशिवाय छोट्या पेटीत १० भेटवस्तू होत्या. या भेटवस्तू देशातील विविध राज्यांमध्ये तयार करण्यात आल्या असून त्या भारतातील विविधतेचे दर्शन घडवतात.



Powered By Sangraha 9.0