चीनमध्ये बार्बेक्यू रेस्टॉरंटला भीषण आग; ३१ जणांचा मृत्यू

22 Jun 2023 16:18:54
gas explosion kills 31 people in a barbecue restaurant

बीजिंग
: चीनमधील यिनचुआन प्रांतातील एका रेस्टॉरंटमध्ये स्फोट होऊन ३१ जणांचा मृत्यु झाला आहे. तर ७ जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारबेक्यू रेस्टॉरंटमध्ये पेट्रोलियम गॅसचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये रेस्टॉरंटचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून संपूर्ण रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. स्थानिक यंत्रणेच्या माहितीनुसार ७ जखमींमधील एक जण अतिगंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, चिनी माध्यमांनी प्रसिध्द केलेल्या फोटोंनुसार रेस्टॉरंटमधील स्फोट हा अतिशय भीषण स्वरुपाचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच, या स्फोटमुळे आजूबाजूच्या दुकानांनाही आग लागली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत ३८ जणांना वाचविण्यात यश आले आहे.

Powered By Sangraha 9.0