'यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही!'

22 Jun 2023 14:25:12

Nashik  
 
 
नाशिक : यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईदसुद्धा एकाच साजरी केली जाणार आहे. मात्र बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देता दुसऱ्या दिवशी देण्याचा निर्णय नाशिकच्या चांदोरी येथील मुस्लिम बांधवानी घेतला आहे. तर जळगावच्या अमळनेर शहरात तर यंदा कुर्बानीच दिली जाणारा नसल्याचा निर्णय मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आला आहे.
 
या पार्श्वभूमीवर सायखेडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी वाय कादरी यांनी ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील प्रमुख हिंदू मुस्लिम बांधवांची बैठक घेऊन त्यांना बकरी ईदच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना दिल्या. मात्र बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने सर्व मुस्लिम बांधवांनी स्वखुशीने त्यांची बकरी ईदची कुर्बानी आषाढी एकादशीच्या दिवशी न देता एकादशीच्या दुसऱ्या दिवशी देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्या आषाढी एकादशीच्या दिवशी मटणाची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0