दर्शना पवार हत्या प्रकरण: आरोपी राहुल हंडोरेला अटक!
22-Jun-2023
Total Views |
मुंबई : एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार हत्या प्रकरणी मित्र राहुल हंडोरे याला अटक करण्यात आली आहे. दर्शना पवारचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला होता. १२ जून रोजी ती राजगडावर राहुल हंडोरेसोबत फिरायला गेली होती. १८ जून रोजी राजगडावर दर्शना पवारचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. एमपीएससी उत्तीर्ण होऊन दर्शना पवार हिची वनअधिकारी पदी निवड झाली होती. त्यानिमित्त पुण्यात सत्कार समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर दर्शना बेपत्ता होती.
दरम्यान, दर्शनाचा मृतदेह सापडल्यानंतर तिचा मित्र राहुल हांडोरे याचा शोध पोलीस घेत होते. दर्शनाची हत्या त्याने केल्याचा संशय आहे. राहुल हांडोरेचं शेवटचं लोकेशन कात्रजमध्ये दिसून आलं होतं. त्यानतंर दोन दिवसांनी दिल्लीत एटीएममधून पैसे काढल्याची माहिती समोर आली होती. तर १८ जून ला रात्री नातेवाईकांशी फोनवर बोलला होता. कोलकात्यातही त्याचं लोकेशन आढळलं होतं.