बागेश्वर धाममध्ये २२० जणांची घरवापसी!

22 Jun 2023 11:26:36
220-christians-ghar-wapsi-in-bageshwar-dham-pandit-dhirendra-krishna-shastri
 
भोपाळ : मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बागेश्वर धाम येथे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या उपस्थितीत २२० धर्मांतरीत ख्रिस्ती लोकांनी हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. याआधीही बालाजीच्या दरबारात घरवापसी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक दशकांपासून, मिशनरींनी गरीब भागांना, विशेषत वंचित घटकांना लक्ष्य केले आहे. त्यांना आमिष दाखवून धर्मांतर केले जाते. त्यामुळे त्यांच्यात हिंदू धर्माबद्दल द्वेष भरलेला आहे.
 
बागेश्वर धाम मध्ये झालेल्या घरवापसी कार्यक्रमात २२० जणांना पिवळ्या रंगाच्या पट्ट्या घालण्यात आल्या. त्यानंतर त्यांना घरी परत पाठवण्यात आले. या लोकांच्या घरवापसीमध्ये 'हिंदू जागरण मंच'ची प्रमुख भूमिका होती. बुंदेलखंड प्रदेशातील टपरियन, बाणापूर, चितोरा आणि बम्हौरी या गावांतील लोक मिशनऱ्यांनी धर्मांतर केलेल्या लोकांना या बागेश्वर धामच्या कार्यक्रमात हिंदू धर्मात घरवापसी करण्यात आली. पीठाधीश्‍वर शास्त्री यांनी यावेळी त्या लोकांना दररोज मंदिरात जाण्याचे आवाहन केले.

दरम्यान धर्मांतर झालेल्या लोकांनी ख्रिश्चन मिशनरींनी त्यांना घर देण्याचे आमिष दाखवले होते. त्यामुळेच त्यांनी हिंदू धर्म सोडला. मात्र धर्मांतर केल्यानंतर मिशनरींने आश्वासन पाळले नाही आणि धर्मांतर केलेल्यांना घरही मिळाले नाही. त्यामुळे धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, लोकांनी शनिवार आणि मंगळवारी हनुमानांच्या मंदिरात जावे. तसेच आपण कोणत्याही पंथाच्या विरोधात नसून आपल्या धर्माचे कट्टर अनुयायी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

तसेच पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही रामचरितमानसला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्याची आणि भारताला हिंदू राष्ट्र करण्याची मागणी केली. तसेच राजकीय पक्षांनी आपल्याकडून आशीर्वादाशिवाय दुसरी अपेक्षा ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.


Powered By Sangraha 9.0