लोअर परेलमध्ये लिफ्ट कोसळून, १४ जखमी!

21 Jun 2023 14:35:39

Lift collapsed 
 
 
मुंबई : लोअर परेलमध्ये एका इमारतीच्या ४थ्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. लोअर परळच्या कमला मील परिसरातील इमारतीत ही दुर्घटना घडली. ट्रेड वर्ल्ड टॉवरच्या सी विंगमध्ये लिफ्ट कोसळली. दुर्घटनेत १४ जण जखमी झाले आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आलीय.
 
ट्रेड वर्ल्ड टॉवरची इमारत १६ मजली आहे. लिफ्ट कोसळल्यानंतर यातील जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. त्यापैकी ८ जखमींना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, १ ला केईएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आणि इतर ४ किरकोळ जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिला.
 
जखमींची माहिती :
 
ग्लोबल हॉस्पिटलमध्ये एकूण ८ जखमींची नोंद झाली नाव: 1) प्रियंका चव्हाण-F/26, 2) प्रतीक शिंदे M/26, 3) अमित शिंदे-M25, 4) मोह. रशीद-M/21, 5) प्रियांका पाटील F/28 वर्ष, 6) सुधीर सहारे M/29, 7) मयूर गोरे-M/28, 8) तृप्ती कुबल-F/46.
केईएम रुग्णालयात : १. किरण विश्वनाथ चौकेकर- एम/४८, प्रकृती स्थिर.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0