जगात भारी योगा अन् नऊवारी, महिलांनी नऊवारी नेसून केली योगासने!

21 Jun 2023 11:50:59
 
Yoga
 
 
मुंबई : भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया येथे नऊवारी साडी नेसून ९० महिलांनी योगासनं केली. विविध रंगांच्या नऊवारी साड्या नेसून वयोवृद्ध महिलांपासून ते लहानग्या मुली सहभागी झाल्या होत्या. भारतीय जनता पक्षाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्हिडीओ ट्वीटर करत केले होते.
 
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधान भवनात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी काही योगासनंही केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
 
 
Powered By Sangraha 9.0