मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अनेक नवनवे खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. त्यातच आता अभिनेता शाहरुख खान यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. सीबीआयकडून तसे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. आर्यन खान आणि शाहरुख खान या दोघांना सीबीआय चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. तसेच. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिचेदेखील नाव समोर आले होते. त्यामुळे या प्रकरणाला एक नवे वळण मिळाल्याचे पाहायला मिळाले होते.
दरम्यान, समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यात झालेले चॅट समोर आले होते. याबद्दल स्वतः समीर वानखेडे यांनी कोर्टात माहिती दिली होती. तसेच, एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सध्या सुरु आहे. तर दुसरीकडे याच प्रकरणात कोर्टाने समीर वानखेडेंना २३ जूनपर्यंत सुटकेपासून संरक्षण दिले आहे. त्याचबरोबर आर्यन खान याचीदेखील चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.