महिलेचे अपहरण करुन काळीमा फासणारं कृत्य ; आरोपी अमजदचा शोध सुरू!

20 Jun 2023 11:57:30
madhya-pradesh-jabalpur-amjad-khan-kidnapped-dalit-woman-rape-force-to-eat-meat-religious-conversion

भोपाळ : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याची घटना घडली आहे. दरम्यान आरोपी अमजद खान हा फरार आहे. अमजदची पीडितेच्या पतीशी मैत्री होती. याचा फायदा घेत त्याने महिलेचे घरातून अपहरण केले. त्यानंतर तिला भोपाळमध्ये बंधक बनवून तिच्यावर अनेक दिवस बलात्कार केला.

हे प्रकरण जबलपूरच्या पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे. ४० वर्षीय पीडित महिलेला दोन मुल आहेत. 19 जून रोजी पीडितेने अमजद खानविरोधात तक्रार दाखल केली. तिचे पती आणि हिंदू धर्म सेना नावाच्या संघटनेचे सदस्यही तिच्यासोबत पोलीस ठाण्यात होते. तक्रारीनुसार, महिलेचा पती मजुरीचे काम करतो. अमजदशी त्याची मैत्री होती त्यामुळे तो त्याच्या घरी जायचा.

2 जून रोजी अमजदने महिलेचे घरातून चाकूच्या धाक दाखवत अपहरण केले. त्यानंतर पीडितेला भोपाळला नेले आणि तिथे अनेक दिवस पीडितेवर बलात्कार केला. यादरम्यान अमजदने पीडितेला जबरदस्तीने मांस खायला लावले. दरम्यान महिलेच्या पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवत अमजदने अपहरण केल्याची शक्यता व्यक्त केली होती. पोलिसांनी महिलेला 8 जून रोजी भोपाळमधून ताब्यात घेतले. मात्र अमजद अद्याप फरार आहे.

या प्रकरणी हिंदू धर्म सेनेचे प्रमुख योगेश अग्रवाल म्हणाले की, पीडितेला ताब्यात घेतल्या नंतर अमजदने दाखविलेल्या भीतीमुळे पीडित महिला गप्प राहिली. मात्र नंतर तिने तिच्या पतीला घडलेली सगळी हकीकत सांगितली. यानंतर त्यांनी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. तसेच योगेश अग्रवाल यांनी आरोप केला आहे की, 50 वर्षीय अमजदने यापूर्वीही एका हिंदू महिलेवर बलात्कार केला होता. तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. अमजदला अटक करण्यासाठी प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आल्याचे योगेश यांनी सांगितले.




Powered By Sangraha 9.0