Video - गोध्रा घातपात की अपघात! टीझर रिलीज

    02-Jun-2023
Total Views |

 


godhra 
 
 
मुंबई : गुजराथ येथील बहुचर्चित हत्याकांड गोध्रा येथ झाले होते. या नावानेच या हत्याकांडाला ओळखले जाते. ही सत्यकथा आहे आणि या कथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलेला आहे. निर्मात्यांनी ट्रेलर सोबतच हा चित्रपट सत्य घटनेवर भाष्य करत असल्याचे म्हंटले आहे.
 
 
 
नेमके त्या ठिकाणी काय झाले होते हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. साबरमती एक्स्प्रेसच्या 'एस-६' डब्याला २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्टेशनवर आग लावण्यात आली होती. या डब्यात ५९ प्रवासी होते व त्यातील बहुतांश अयोध्याहून परतणारे कारसेवक होते. या घटनेनंतर दोन दिवसानेच गुजरातमध्ये दंगल उसळली होती. दंगलखोरांनी नरोदा पाटीया परिसराला टार्गेट करून या भागात आगी लावल्या होत्या. यावेळी दंगलखोरांनी नरोदा पाटीयात ९७ लोकांची हत्या केली होती. या हल्ल्यात ३३ लोक जखमी झाले होते.